Tuesday, June 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "त्यांच्या मनात पाप जरी, तरी त्यांना…"; मोदींच्या वाढदिवसाबाबत उध्दव ठाकरे...

Uddhav Thackeray: “त्यांच्या मनात पाप जरी, तरी त्यांना…”; मोदींच्या वाढदिवसाबाबत उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai
मातोश्रीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे. ते ७५ वर्षांचे होताय. या बाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मोदी माझे कुणी दुश्मन नाही. मी त्यांना माझे दुश्मन मानतच नाही. मोदी जरी मला दुश्मन मानत असले तरी, मी त्यांना दुश्मन मानत नाही. ते ज्या पद्धतीने शिवसेना संपवायला निघाले आहेत, हे कुणीही राजकारणी सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप जरी असले तरी, मी त्यांना शुभेच्छा देतो’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भाष्य केले. भूतकाळात मोदींनी काही घोषणा केल्या होत्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “भूतकाळात त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट सिटी, १५ लाख खात्यात येणार, अच्छे दिन या घोषणांची भूत त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत”.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जून २०२६ – रस्ते वाहनांसाठीच नव्हे पादचार्‍यांसाठीदेखील!

0
देशातील वाढत्या शहरीकरणाच्या चक्रात ‘रस्ते रूंद आणि फुटपाथ अरूंद’ असे विरोधाभासाचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय कोट्यवधी पादचार्‍यांसाठी आशेचा...