Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती कधी करणार?उध्दव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "ते...

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती कधी करणार?उध्दव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “ते येतील, पण माध्यमांनी…”

मुंबई | Mumbai
मातोश्रीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. कौटुंबिक कार्यक्रम, गणेशोत्सव यानिमित्त राज ठाकरे आणि उध्दव ठाकरेंनी एकमेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यानंतर लवकरच दोघांची युती जाहीर होणार, अशी चर्चा होती. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

- Advertisement -

आम्ही दोघांनी किती मोदक खाल्ले याचीही माध्यमांत चर्चा
राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उध्दव ठाकरे म्हणाले, मागच्या आठवड्यात राज ठाकरेंच्या घरी तुम्ही जवळपास अडीच तास वेळ घालवला. त्यावेळी काय चर्चा झाली. या प्रश्नावर उद्धव ठाकरे गमतीत म्हणाले की, मी नाही गेलो किंवा गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे नेमकी अडचण होते, हे माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो. तसेच माझ्या वाढदिवसाला ते इथे मातोश्रीवर आले होते. आम्ही दोघांनी किती मोदक खाल्ले याचीही माध्यमात चर्चा झाली, असे त्यांनी म्हटले.

…त्यामुळे आमचे आता येणे-जाणे सुरु आहे
राज ठाकरे शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात दिसणार का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे…” राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात भेट देण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, मावशी (राज ठाकरेंची आई) मला घरी येत रहा, असे मागच्या वेळी म्हणाली होती. त्यामुळे आमचे आता असेच येणे-जाणे सुरू आहे.

लवकरात लवकर घोषणा करण्यात येईल
याचवेळी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार? असाही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीची तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे आता दसरा मेळ्याव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होते का? हे पाहावे लागेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...