Thursday, July 4, 2024
Homeराजकीयएनडीएसोबत जाणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, "मला जायचं..."

एनडीएसोबत जाणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाले, “मला जायचं…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपप्रणीत एनडीएला (NDA) २९४ तर इंडिया आघाडीला (India Alliance) २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चारशे पार’चा नारा दिला होता. पंरतु, या निवडणुकीत भाजपला स्वबळावर २४० जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप ‘अडीच’शे जागा देखील पार करू शकली नाही.

हे देखील वाचा : महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार – उद्धव ठाकरे

यानंतर भाजपला (BJP) केंद्रात सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. भाजपच्या या सत्तास्थापनेत बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयु आणि आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिला. मात्र, महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागांचा नारा देणाऱ्या भाजपसह महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. यात भाजप ०९, शिंदेंची शिवसेना ०७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०१ जागा मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला राज्यात ३० जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ठाकरेंची शिवसेनेला ०९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ०८ आणि कॉंग्रेसला १३ जागांवर विजय मिळाला आहे.

हे देखील वाचा : महायुतीची दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला असून त्याने आपला पाठिंबा मविआला दिला आहे. त्यामुळे मविआची संख्या राज्यात ३१ वर पोहचली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या यशानंतर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यावर अखेर आज उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मविआच्यावतीने आज जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : मिरवणुकीने नवागतांचे शाळेत स्वागत

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुम्ही पुन्हा एनडीएबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर देत विषय संपवल्याचे दिसून आले. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना भविष्यात तुम्ही नरेंद्र मोदींसोबत दिसतील असे रवी राणा यांनी म्हटले असल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी केवळ ‘ठीक आहे जाऊदे, असे उत्तर दिले. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी नेहमी अशी चर्चा का होते असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बरं ठीक हे समजा मला जायचं, मग यांच्यामध्ये (महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये) बसून तुम्हाला सांगू का?, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी “नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्याबरोबर दिसतील”, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले होते. त्यावर आज उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या