नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील (Nashik) एका नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या आवारात गंभीर प्रकार समोर आला आहे. एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape) करून, तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित तंजिर इनामदार (२१, रा. चांदवड) याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली असून, या प्रकरणातील धक्कादायक खुलाशांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर
पीडित तरुणी मूळची जळगावची (Jalgaon) असून ती म्हसरुळ परिसरातील एका महाविद्यालयात (Collage) इंजिनिअरिंगचे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या फिर्यादीनुसार जून २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत संशयित तंजिरने पीडितेचा पाठलाग करून, महाविद्यालयाचा परिसर, दिंडोरी रोडवरील उद्यान आणि विविध हॉटेल्समध्ये तिच्यावर अत्याचार केले. संशयिताने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर पीडितेच्या गळ्याला ‘लव्ह बाइट’च्या नावाखाली जबर चावा घेऊन तिला जखमी केले आणि त्यावेळचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीनुसार, संशयिताने पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही प्रयत्न केला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात
पीडितेच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि हातातील धार्मिक धागे बळजबरीने काढून तिला एका विशिष्ट धर्माप्रमाणे कृती करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर पीडितेला बळजबरीने सिगारेट ओढायला लावणे आणि लॉजवर नेऊन दारू पाजून अत्याचार करणे, असे गंभीर प्रकार तंजिरने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शनिवारी (दि. १८) संशयिताला दिवाणी न्यायाधीश एम. व्ही. भराडे यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील मनीषा वारुंगसे यांनी युक्तिवाद केला. तसेच पोलीस निरीक्षक तथा तपासाधिकारी ज्योती आमणे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रकरणात धर्मांतराचा दावा केला जात असला तरी, अद्याप तसे पुरावे मिळालेले नाहीत. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याचे कलम तपासाअंती आवश्यकतेनुसार जोडले जाईल. शिवाय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) केले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पाचव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी
असा झाला युक्तिवाद
- संशयिताने पीडितेवर खर्च करण्यासाठी लागणारे पैसे कोठून आणले ?
- या कृत्यामागे कोणाचे आर्थिक पाठबळ आहे का?
- अशाच प्रकारे इतरही किती तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले आहे?
- संशयिताच्या वकिलांनी दोघेही एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला आहे
- पीडितेने मांडलेली आपबिती गंभीर आहे.




