Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पाचव्या गुन्ह्यात 'इतक्या'...

Ashok Kharat Crime News : अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पाचव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याला शनिवारी (दि. १८) रोजी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरातला पाच दिवसांची म्हणजे (दि.२३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर

एकीकडे पोलीस कोठडीचा मुक्काम लांबत असतानाच, दुसरीकडे ‘ईडी’ने त्याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ८ गुन्हे हे केवळ महिलांवरील अत्याचाराचे आहेत. उर्वरित ७ गुन्हे खंडणी, सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात

दरम्यान, आतापर्यंत केवळ ४ गुन्ह्यांचा तपास झाला असून, अद्याप ११ गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात आज रविवारी (दि. १९) एसआयटीने खरातला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यामुळे खरातचा पुढील काळ पोलीस कोठडीतच जाणार असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : Bus Accident : समृद्धी महामार्गावर रिल्सच्या नादात भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

ताज्या बातम्या

मनोज

संजय शिरसाट, उदय सामंतांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवायची; मनोज जरांगेंचा गंभीर...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख...