Saturday, April 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू, त्याला उपाय काय? 'सामना'च्या मुलाखतीत...

Uddhav Thackeray: पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू, त्याला उपाय काय? ‘सामना’च्या मुलाखतीत उध्दव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai
शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत, शिवसेनेची अलीकडच्या काळातील कामगिरी, भविष्यातील धोरणं यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की महाराष्ट्रात सध्या खूप घडामोडी होत आहेत, वेगवेगळे वारे वाहत आहेत. शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच देश अशांत, अस्थिर ठेवायचा हेच भाजपचे धोरण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दलही उध्दव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पक्ष सोडून जाणाऱ्यांवर ही भाष्य केले आहे. देशाच्या राजकारणात किंवा महाराष्ट्रात सत्ता आणि पैशांचा अतिरेकी वापर सुरू आहे. यामुळे ज्यांना तुम्ही घडवले, ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा दिली. आधी आमदार, खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, तुमचे असतील, तुमचे लोक निघून जात आहेत. कालपर्यंत माझ्याबरोबर होता, माझ्या बैठकीला होता, कालपर्यंत माझा जयजयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता. बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता. उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, यांचे २४ तासांत मतपरिवर्तन होते आणि ते निघून जातात. मोहाला बळी पडतात, हे पाहिल्यावर राजकारणाचा उबग येतो का, पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे वारे वाहतायत, परंतु या वाऱ्यांमध्ये काही हवेचे फुगे देखील आहेत. म्हणजे ते फुगे काही काळ वर जातात, तरंगतात आणि नंतर त्यातील हवा निघून गेली की ते खाली पडतात. असे काही फुगे सध्या तरंगत आहेत ते फुगे म्हणजे काही वारे नाहीत.

असे दिवटे गेलेलेच बरे
पुढे उध्दव ठाकरे असे ही म्हणाले की, “काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण त्याला बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा चांगला माणूस घेतो तेव्हा बरे वाटते की, चला एक ‘बला’ टळली! आता आमच्यातून जे लोक तिकडे गेले आहेत, ते तिकडे काय दिवे लावत आहेत ते तुम्ही बघत आहातच. त्यामुळे असे दिवटे गेलेलेच बरे.”

मला राजकारणाचा नाही, तर राजकारण्यांचा उबग येतो. हे राजकारण नाही. याला मी राजकारण म्हणू शकत नाही. हे जसे बाळासाहेब म्हणायचे, तसे हे गजकर्ण आहे. सत्तेची खाज यांना एवढी सुटते की, जेवढे खाजवाल तेवढे कमी. त्यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाली ना, तरी सोसायटीची निवडणूक असली, तरी माझाच माणूस पाहिजे. दूधसंघ असला, तरी माझाच माणूस पाहिजे, असा खोचक टोला लगावत, आम्ही घडवण्याचे काम केले, बिघडवण्याचे काम कोणी केले पाहा. तुम्ही निवडणुकीचा प्रचार कशासाठी करत आहात. असेच करायचे असेल, तर निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा. प्रचाराला जाऊच नका.

शिवसेना जमीनदोस्त होत नाही, कारण…
दरम्यान, शिवसेना हा एक विचार होता आणि आहे. शिवसेना हे लोहचुंबक आहे, असे बाळासाहेब म्हणायचे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झाला का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या अनेक पिढ्या आजही शिवसेनेसोबत आहेत. कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेने मोठे केले, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठे करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतके करूनही हे संपत कसे नाहीत? शिवसेना जमीनदोस्त होत नाही, कारण शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, म्हणून तुम्ही संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमची मूळे जमिनीच्या खाली गेलेली आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...