Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: बटेंगे तो कटेंगेला उध्दव ठाकरेंचे उत्तर; म्हणाले, आम्ही तुटू देणार…

Uddhav Thackeray: बटेंगे तो कटेंगेला उध्दव ठाकरेंचे उत्तर; म्हणाले, आम्ही तुटू देणार…

कोल्हापूर | Kolhapur
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत जनतेवर आश्वासनांची लयलूट केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी शाह यांच्यावरही निशाणा साधला. तसेच योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे घोषणेला उध्दव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.

सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण व्हायला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, पण तो पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. ही तुमची भक्ती छत्रपती शिवरायांबद्दल? कोश्यारी राज्यपालपदी बसले होते, त्यांच्याविरोधात आपण मोर्चा काढला. भाजपाने, शिंदेंनी त्यांचा निषेध केला नाही. महाराजांचा अपमान केला तर काय झाले, माझा तर अपमान नाही ना केला, असे मोदी म्हणाले असतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही महाराजांचे पुतळे नाही उभारणार तर, प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार.

- Advertisement -

हे ही वाचा: Uddhav Thackeray: खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आला…; कोल्हापूरमधून उध्दव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

मशालगीतामधील जय शिवाजी आणि जय भवानी शब्द काढण्याचा मुजोरपणा तुम्ही केलात. पण अद्यापही तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तुम्ही माझ्यावर कारवाई करा. मग संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करणार. मला जमले ना तर सुरतमध्येही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन. इंग्रजांना विरोध करण्याकरता महाराजांनी जी सुरत लुटली त्याच सुरतेला तुम्ही गद्दारांना घेऊन गेलात. त्याच सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मी काय चूक केली हे मला सांगा. सगळी कामे करून देखील आमचे सरकार पाडले. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे वाकडे करू देत नव्हतो म्हणून त्यांनी सरकार पाडले. महाराष्ट्र लुटून त्यांना गुजरातला न्यायचे होते म्हणून त्यांनी सरकार पाडले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. माझी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती आहे की, पुढील १५ दिवस त्यांनी देशभरातली नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही तुटू देणार नाही
“आपण सगळ्यांनी ठरवले पाहिजे. त्यांनी एक घोषणा दिलीये, बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार आहे तुम्हाला? मी एक घोषणा देतोय, आम्ही तुटू देणार नाही. आम्ही लुटू देणार नाही. आम्ही यांना तोडायला देणार नाही आणि आम्ही यांना लुटायला देणार नाही, कारण हा आमचा महाराष्ट्र आहे. मशाल धगधगणार आणि खोकेवाले जळून भस्म होणार”, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या