Thursday, September 17, 2026
Homeक्राईमShrirampur : उक्कलगाव येथे 27 वर्षीय तरुणाचा खून

Shrirampur : उक्कलगाव येथे 27 वर्षीय तरुणाचा खून

मानेवर धारदार शस्त्राने वार? || दोनजण पोलिसांच्या ताब्यात

उक्कलगाव |वार्ताहर| Ukkalgaon

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील उक्कलगाव (Ukkalgaon) येथे एका 27 वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून (Murder) केलीची घटना घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात आहे. आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय 27, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मयत तरुणाचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष पारखे हे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय रत्नाकर पारखे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. आशिष यांची सासुरवाडी कोपरगाव (Kopargaon) येथे असून, ते गेल्या दोन महिन्यांपासून सासुरवाडीकडे राहत होते.

- Advertisement -

मात्र, कालरात्रीच्या सुमारास आशिषचा याचा मृतदेह पडवीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयत आशिषच्या मानेवर जबरी धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी सुरू असून. मयताचे वडील विजय पारखे यांनी मात्र आशिषच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त करत मारेकर्‍यांनी आशिषला जबर मारहाण (Beating) करून रात्री मृतदेह पडवीत आणून टाकला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त (Seized) आले का? याबाबत ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट दिली. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस तपासाअंतीच खूनाचे (Murder) नेमके कारण आणि सत्य बाहेर येणार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस तपासानंतर खूनाचे रहस्य समोर येणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : जोपूळ आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आश्रमशाळांमधील असुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (दि.१७) सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील...