Tuesday, October 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News: जाहिरातींचे होर्डिंग दिसण्यासाठी झाडांचा बळी! ​फक्त १० हजारांच्या सुपारीत...

Nashik Crime News: जाहिरातींचे होर्डिंग दिसण्यासाठी झाडांचा बळी! ​फक्त १० हजारांच्या सुपारीत गंगापूर रोडचा हरितपट्टा उद्ध्वस्त; नेमकं प्रकरण काय?

नाशिक ।प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल (Gangapur Road Jehan Circle) ते बेंडकुळे नगर (Bendkule Nagar) दरम्यान दुभाजकात लावण्यात आलेली तब्बल ५५ झाडे (55 Plants Cut) रातोरात तोडल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक अँगल समोर आला आहे. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटवर जाहिरातींचे दुहेरी फलक (होर्डिंग्ज) (Hoardings) लावण्यासाठी वाहनधारकांचा दृष्टीक्षेप अडवणाऱ्या ५५ झाडांचा अवघ्या १० हजार रुपयांच्या सुपारीत बळी देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
​
अवघ्या १० हजारांच्या बदल्यात झाडांचा बळी
महानगरपालिकेसह इतर खासगी संस्थांची प्रसिद्धी करणाऱ्या एका खासगी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा चालक संशयित मच्छिंद्र देशमुख याने आपल्या जाहिरातबाजीच्या आड येणारी झाडे हटवण्यासाठी संशयित अभिमन्यू खैरनार (वय ४५, मूळ रा. मालेगाव) याला १० हजार रुपयांची सुपारी दिली होती. या सुपारीतूनच ३० ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते पावणेतीनच्या दरम्यान हा वृक्षसंहाराचा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी श्रीकांत इरणक यांनी फिर्याद नोंदविली आहे.

कंत्राटदारांच्या जवळचा मानला जात असल्याचा दावा
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित अभिमन्यू खैरनारसह देशमुखची महापालिका उद्यान विभागात वारंवार चकरा मारत असल्याचे समोर आले आहे. उद्यान विभागाकडून वृक्षतोड व तत्संबंधीची कामे करणाऱ्या काही कंत्राटदारांच्या तो जवळचा मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात महापालिकेतील कंत्राटदार अथवा कर्मचाऱ्यांचे अभय लाभले होते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. या गुन्ह्यात अभिमन्यू खैरनार व त्याचे इतर ३ साथीदार संशयित असून बीएनएस कलमांसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन कायदा २०२१ (कलम २१-१); पर्यावरण संरक्षण कायदा (कलम १५); सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा १९८४ (कलम ३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंच्या यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; टेक ऑफ घेतानाच घडला प्रकार

सहसंशयित करणार
​गंगापूर पोलिसांनी संशयित अभिमन्यू खैरणार याला अटक केली असून, मुख्य सूत्रधार असलेल्या जाहिरात एजन्सी चालक मच्छिंद्र देशमुख याला या गुन्ह्यात सहसंशयित केले आहे. तर, वृक्षताेडीत सहभागी मजुरांनाही संशयित करुन ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे अधिक तपास करत आहेत.

२५ टक्क्यांत राखरांगोळी!
​महानगरपालिकेने रस्त्याचे सुशोभीकरण व सावलीसाठी दुभाजकात लावलेल्या टर्मिलिया मादागास्कर (इंडियन ख्रिसमस ट्री) या परदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची कत्तल करण्यात आली. महापालिकेच्या नोंदीनुसार या झाडांचे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, ॲड. एजन्सी चालकाने आपल्या जाहिरातींचा व्यवसाय चमकवण्यासाठी अवघ्या १० हजार रुपयांत हा हरितपट्टा साफ केला.

ताज्या बातम्या

IND vs NZ : भारताला मालिका विजयाची संधी; ईशान किशन दुखापतीमुळे...

0
नवी दिल्ली | New Delhi भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (मंगळवारी)...