Sunday, September 27, 2026
Homeनगरबसस्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

बसस्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

शिरूर (तालुका प्रतिनिधी)

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात बसस्थानकाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली.

- Advertisement -

कवठे येमाई येथील रहिवासी पांडुरंग सुरेश भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील निलेश ढोबळे यांनी त्यांना फोन करून सांगितले की, बसस्थानकाच्या मागे एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला असून त्याच्या अंगावर मुंग्या लागलेल्या आहेत. यानंतर भोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.

या घटनेची माहिती मिळताच पांडुरंग भोर यांनी तात्काळ टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर, मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे शिरूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस हवालदार शरद वारे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृत व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...