Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकामगारनगरात खळबळ; घराच्या टेरेसवर गोणीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कामगारनगरात खळबळ; घराच्या टेरेसवर गोणीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

सातपूर | प्रतिनिधी Satpur

- Advertisement -

आडगाव परिसरात काही दिवसांपूर्वी सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी कामगारनगर परिसरात एका घराच्या टेरेसवर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.कामगारनगरातील साईबाबा मंदिराजवळील गल्लीत रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता एका घराच्या टेरेसवर ठेवलेल्या गोणीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून तो काही दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह गोणीत भरून टेरेसवर टाकण्यात आल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह तेथे कसा आणण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

या घटनेमुळे कामगारनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...