Tuesday, October 15, 2024
Homeमहाराष्ट्रUnion Budget 2024 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 'इतक्या' कोटींची तरतूद

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रतिनिधी | New Delhi 

आज वर्ष २०२४-२५ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ७ हजार ५४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी

संसेदचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी (दि. २२ जुलै) पासून सुरू झाले आहे. वर्ष २०२४-२५ साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासासाठी व देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

आजच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या १३ पायाभूत प्रकल्पांसाठी (Infrastructure Projects) ७ हजार ५४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असेल. यामध्ये विदर्भ-मराठवाडा दुष्काळग्रस्त सिंचन प्रकल्पांसाठी रूपये ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळेल. यासोबतच, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार प्रकल्पांतर्गत ४०० कोटी रूपयांची, सर्वसमावेशक विकासकामांसाठी (इकॉनॉमिक कॉरिडॉर) या प्रकल्पासाठी ४६६ कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत पर्यावरणपूरक कृषि प्रकल्पासाठी ५९८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन

तसेच महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी १५० कोटी (केंद्रशासनाकडून मिळणारा वाटा), मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी ९०८ कोटी, मुंबई मेट्रो साठी १ हजार ८७ कोटी, दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरकरिता ४९९ कोटी, मुंबई महानगर प्रदेश हरित शहरी गतिशीलता प्रकल्पासाठी १५० कोटी,  नागपूर मेट्रोसाठी ६८३ कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ८१४ कोटी, नाग-नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ५०० कोटी तर मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी ६९० कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, या तरतुदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळेल , विशेषतः ग्रामीण रस्ते सुधार, मेट्रो प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉर आणि नदी पुनरुज्जीवन यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या