नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज शनिवार (दि.०१ फेब्रुवारी) रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
यात सरकार (Government) पहिल्यांदा एससी आणि एसटीच्या पाच लाख नव्या लघुउद्योजक महिला घडवण्यासाठी दोन कोटी रुपये मुदतीचे कर्ज देणार आहे. महिलांना (Women) कोणत्याही अटींशिवाय हे कर्ज मिळणार असून त्यावर त्यांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. तसेच महिलांना स्टार्टअप्ससाठी सरकार १० हजार कोटी रुपयाचा निधी देणार आहे. त्यासोबतच इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन देखील करण्यात येणार आहे.
तर महिलांना (Women) उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांची जोडण्याची संधी दिली जाणार आहे. देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार आहे. तसेच सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० कार्यक्रमांतर्गत ८ कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरविण्यात येणार आहे. तर १ कोटी महिलांना आणि २० लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत कोणती मदत दिली जाईल?
सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेंतर्गत महिलांना कोणत्याही हमीशिवाय सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून त्या स्वतःचे छोटे आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील. सरकारच्या या योजनेंतर्गत महिलांना ५ वर्षांसाठी २ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत कर्जाची सुविधा मिळणार असून याचा लाभ ५ लाख महिलांना होणार आहे. याशिवाय, त्यांना डिजिटल प्रशिक्षण, विपणन समर्थन आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी सरकारी योजनांशी जोडण्याची सुविधा देखील दिली जाईल.