नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज शनिवार (दि.०१ फेब्रुवारी) रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेती, उत्पादन, रोजगार, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर दिल्याचा पाहायला मिळाले.
यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादने आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर (इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसेच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पानंतर कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या महाग होऊ शकतात हे जाणून घेऊयात.
काय स्वस्त?
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. त्यासोबतच या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यव्यवस्थेकडे विशेष भर देण्यात आला आहे. ज्यामध्ये ३६ जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या ३६ औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
काय महाग?
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेषताः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.