नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज शनिवार (दि.०१ फेब्रुवारी) रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात संसदेत सादर करण्यास सुरुवात केली असता विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. मात्र तरीही अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करणे सुरूच ठेवले.
यावेळी सीतारामन म्हणाल्या की, ” अर्थसंकल्प विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणे या सरकारच्या या हेतूनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सरकारची वाटचाल यशस्वीपणे सुरु असून याला विकसित भारताच्या संकल्पनेतून प्रेरणा मिळत आहे”,असे त्यांनी म्हटले.
तसेच “सरकार पंतप्रधान धनधान्य योजना राज्य सरकारांसोबत राबवेल. त्यात शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं असेल. यातून १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. यात १०० जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं जाईल. तसेच तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल,”असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
सीतारामन पुढे म्हणाल्या की,”भारताचा मत्स्य उत्पादनात जगभरात दुसरा क्रमांक लागतो. त्यात शाश्वत उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी काम केलं जाईल. अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.तर बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. तसेच देशात ५. ७ कोटी लघुउद्योग असून त्यातून ७.५ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे.त्यामुळे लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील”, असेही त्यांनी सांगितले.
सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
महिलांसाठी विशेष तरतूद
बिहारमधील शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद
कृषी क्षेत्रात गुंतवणुकीत प्राधान्य
राज्यांमध्ये विविध योजना राबविल्या जाणार
ग्रामीण महिलांसाठी विशेष योजना राबवविणार
देशातील 100जिल्ह्यावर विशेष लक्ष
मत्स्य उत्पादनावर विशेष योजना
Textile क्षेत्रात अधिक भर
डाळ उत्पादनासाठी 6 वर्ष विशेष. योजना
Msme योजनेला 20 कोटी पर्यंत कर्ज
आसाम मध्ये युरिया प्रकल्प उभारणार
सक्षम आंगणवाडी