Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAmit Shah on Rahul Gandhi : "जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत..."; अमित शाहांचा...

Amit Shah on Rahul Gandhi : “जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत…”; अमित शाहांचा राहुल गांधींना इशारा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America Tour) असून त्यांचा हा दौरा चांगलाच वादात सापडला आहे.या दौऱ्यात त्यांनी आरक्षणावर (Reservation) केलेल्या विधानावर भाजपसह इतर पक्षाच्या नेत्यांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावर भूमिका मांडत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर (ट्विट) एक पोस्ट केली आहे. शाह यांनी केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानांच्या संदर्भात त्यांना व काँग्रेसला (Congress) लक्ष्य केले आहे. शाहांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देशविरोधी बोलणं आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभं राहणं ही राहुल गांधी व काँग्रेसची सवयच झाली आहे. मग तो जम्मू-काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी व आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणं असो किंवा मग विदेशातील व्यासपीठांवर भारताच्या विरोधात बोलणं असो, राहुल गांधींनी देशाची सुरक्षा व भावनांना कायम धक्का पोहोचवला आहे”, असे अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शाहांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर (Country) आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात”, अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींना व काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

अमित शाह यांचा राहुल गांधींना इशारा

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ” मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करू शकत नाही”,असे अमित शाह यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे.

हे देखील वाचा : नाफेड कांदा घोटाळ्याची चौकशी; पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल

राहुल गांधी आरक्षणाबद्दल नेमकं अमेरिकेत काय बोलले?

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती.जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याबद्दल विचार करेन.मात्र, सध्या भारतात अशी परिस्थिती नाही. जेव्हा तुम्ही आर्थिक आकडे बघता, तेव्हा आदिवासींना १०० रुपयातून १० पैसे मिळत आहेत. दलितांना १०० रुपयातून ५ रुपये मिळतात आणि ओबीसींनाही इतके पैसे मिळतात. भारतातील बिझनेस लिडर्सची जर यादी बघितली, तर मला वाटते टॉप २०० मध्ये एक ओबीसी आहे. खरंतर त्यांची संख्या भारतात ५० टक्के आहे. पण, आम्ही या आजारावर उपचार करत नाही”, असे राहुल गांधी म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

राहुल गांधींचे आरक्षणाबद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण

आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावरही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवले जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचे पसरवले जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाही. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या