Friday, September 20, 2024
Homeक्रीडाNashik News : 'अस्मिता खेलो इंडिया' उपक्रमाअंतर्गत महिला खेळाडूंना सक्षम करणार -...

Nashik News : ‘अस्मिता खेलो इंडिया’ उपक्रमाअंतर्गत महिला खेळाडूंना सक्षम करणार – मंत्री खडसे

नाशिक | Nashik

- Advertisement -

‘अस्मिता खेलो इंडिया’ (Asmita Khelo India) हा महिलांसाठीचा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. यापुढे सरकारकडून आणखी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Minister Raksha Khadse) यांनी केले. महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे भारतीय खेल प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या अस्मिता खेलो इंडिया या उपक्रमाअंतर्गत आयोजित पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वुमन्स लीग ज्यूदो स्पर्धेला सुरुवात झाली. त्यावेळी उद्घाटन करताना खेडसे बोलत होत्या.

हे देखील वाचा : Nashik News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश आणि दीव-दमण अशा सात राज्यांच्या ८९४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सब ज्युनियर,कॅडेट, ज्यूनियर आणि सिनियर अशा चार गटामध्ये स्पर्धा खेळविली जात आहे. या प्रत्येक गटात सात वजनी गट आहेत. उद्घाटनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. यामध्ये छतीसगडाच्या (Chhattisgarh) महिलांनी (Women) पहिला दिवस गाजवला.

हे देखील वाचा : Nashik News : मंत्री छगन भुजबळांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

तसेच खुल्या गटात ३६ किलो वजन गटात छत्तीसगडच्या ममता मेतांम हिने पहिला तर योगिता मांडावी हिने दुसरा क्रमांक मिळवून सुंदर सुरुवात केली. तर गोवा राज्याची पूर्ती लोटलीकर हीने तिसरा क्रमांक मिळविला.तसेच उद्या आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२.३० आणि दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत अशी माहिती कनोजिया आणि नीतू सिंग यांनी दिली आहे.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश धाडवे, रवींद्र मेटकर, योगेश शिंदे, विजय पाटील, स्वप्नील शिंदे, वाघचौरे, सुहास मैंद त्यांचे सर्व सहकारी आणि राष्ट्रीय पंच, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या