Thursday, April 30, 2026
HomeनगरShirdi : मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो, तरी उमेदवार ‘रिपाइं’चाच! -...

Shirdi : मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो, तरी उमेदवार ‘रिपाइं’चाच! – आठवले

राज्यसभेची हॅट्रीक साधून आठवले साईचरणी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्यसभेवर सलग तिसर्‍यांदा निवडून येत विजयाची हॅट्रीक साधल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो तरी मी रिपब्लिकन पक्षाचाच उमेदवार आहे, असे स्पष्ट करत त्यांनी आगामी काळात आरपीआयला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे ही संधी मिळाल्याचे आठवले यांनी आवर्जून नमूद केले. शिर्डीचा खासदार होण्याची माझी तीव्र इच्छा होती, मात्र नियतीने मला आता संपूर्ण राज्याचा खासदार म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हॅट्रीक दिलेल्या संविधानाच्या आधारावर सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगत, भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक स्तरावर नेण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आठवले यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी देशात जातीय तेढ निर्माण करण्याचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर झालेली निवड हा दलित पँथर चळवळीचा आणि महिला शक्तीचा सन्मान असल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, मात्र हा घातपात वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि रशियाशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे भारतीय व्यापार्‍यांना जागतिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....