Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत 24 तासांत तब्बल 2 लाख नवे करोना रुग्ण

अमेरिकेत 24 तासांत तब्बल 2 लाख नवे करोना रुग्ण

वॉशिंग्टन –

जगभरात करोनाबाधितांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 6,56,21,075 वर पोहोचली आहे. करोनामुळे जगभरात आतापर्यंत 15,13,793 हून अधिक लोकांना

- Advertisement -

आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. करोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील करोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत 24 तासांत कोरोनाचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. तसेच करोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 10 हजार नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 2 हजार 907 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत करोना रुग्णांची एकूण संख्या ही एक कोटी 40 लाख झाली आहे. तर मृतांची संख्या ही दोन लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येथील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या