देवळा | प्रतिनिधी Deola
देवळा शहराच्या रस्त्यांवर दिसला देशभक्तीचा जल्लोश, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या़च्या आवाहानाला प्रतिसाद देत देवळा शहरात आ. डॉ.राहूल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
आज सकाळी अकरा वाजता शहरातील शिवस्मारक व नगरपचायत प्रांगणात शहरातील सर्व पक्षीयांसह परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थींसह देश सेवेत सहभागी झालेले सेवा निवृत्त सैनिकांनी आपला मोठा सहभाग नोंदविली.
यावेळी देवळा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय (संभाजी) आहेर, पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते, अतुल पवार, जितेंद्र आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर, मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटिल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शहराध्यक्ष अशोक आहेर, तुषार गुंजाळ, राष्ट्रवादीचे संतोष शिंदे, शिवसेनेचे भाऊसाहेब चव्हाण, आदिंसह विविध संस्थाचे पदाधिकारी, शहरातील देवळा महाविद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, तिरुपती इंग्लिश स्कूल, एस. के. डी. इंग्लिश स्कूल, आदी शाळांच्या शेकडो विद्यार्थींसह शहरातील देश प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रारंभी शिवस्मारक येथून निघालेली ही भव्य रॅली हातात तिरंगा घेत मनात देशभक्ती व ओठांवर भारतमातेचा जयघोष, अशा अमाप उत्साहात शहरातील सुभाष रोड मार्गे निमगल्ली, सराफ बाजार, व्यापारी पेठ, मार्गे शिवस्मारक, पाचकंदिल येथे आल्या नंतर राष्ट्र गित, व देशभक्तीपर गिताने रॅलीचे समारोप करण्यात आले.
सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाने शहरातील वातावरण देश भक्तीमय झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन पूनम अहिरराव यांनी केले.तर पोलीस निरिकक्ष सार्थक नेहेते यांनी आपल्या सहकार्यांसह चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत केली.




