Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; नगरसुलला मका पिकाचे नुकसान

येवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; नगरसुलला मका पिकाचे नुकसान

येवला | प्रतिनिधी Yeola

शहरासह तालुक्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने काढणीला आलेला कांदा, गहू पिकांसह शेतातील उभ्या मका पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आजच्या पावसाने नगरसुल येथील वडाचा मळा भागातील शेतकऱ्याचे उभी मका पावसाने आडवी झाली आहे.

- Advertisement -

शहरासह तालुक्यातील नगरसुल, मुखेड, पाटोदा, अंदरसुल, राजापूर, खिर्डीसाठे, मातुलठाण, कोळगाव, निमगाव मढ, साताळी, एरंडगावसह बहुतांशी गावात या पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. आज, गुरुवारी, (दि. २) दुपारी चार वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस काही भागात सायंकाळ पर्यंत सुरूच होता.

अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरातही अनेक भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. देवीखुंट, आझाद चौक भागात तर दीर्घकाळ वीज खंडित राहिल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली गेली.

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...