देवळा । प्रतिनिधी Deola
कसमादेचे भूमिपुत्र व माजी मंत्री स्व.डॉ.दौलतराव आहेर यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त देवळा येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार (ता.१) करण्यात आले. या कार्यक्रमास स्व.डॉ.आहेरांवर प्रेम करणाऱ्या कसमादेसह नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी हजेरी लावली
स्व.डॉ.आहेर यांचे बंधू डॉ. बाळासाहेब आहेर यांच्या संकल्पनेतून हा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. स्व.डॉआहेर यांच्या नेहमीच संपर्कात असलेल्या या समारंभास जुने सवंगडी, मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी व विचारांचे आदानप्रदान झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून स्व.डॉ.आहेर यांचे स्मारक व्हावे अशी जनतेची व कार्यकर्त्यांची इच्छा होती. १९ जानेवारी २०१६ रोजी बाबांचे निधन झाले आणि त्यानंतर बाबांच्या स्मृती कायम राहव्यात अशी संकल्पना असली तरी त्याचे प्रत्यक्षात रूपांतर होत नव्हते. मात्र आज जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचे सुपुत्र आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या देवळा येथील निवासस्थानी पुतळा उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली.
या समारंभास जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हजेरी लावत त्यांच्या स्मृती जाग्या केल्या.पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर सहा ते सात तास कार्यकर्ते व जनतेची अभिवादनासाठी रीघ लागली होती. यावेळी खास करून शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार शोभा बच्छाव, आमदार नितीन पवार, सुहास कांदे, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दिलीप बोरसे, माजी केंद्रीयमंत्री भारती पवार,
नाफेडचे संचालक केदा आहेर, कौतिक पगार, संजय चव्हाण, दिपीका चव्हाण, नीलिमा पवार, दिलीप मोरे, नितीन ठाकरे, नीलिमा पवार, सुधाकर बडगुजर, दिलीप मोरे, रवींद्र पगार, श्रीराम शेट्टी, विश्वासराव देवरे, मधुकर हिरे, नाना दळवी, अरुण देवरे, रंजन ठाकरे, डॉ.जे.डी. पवार, अशोक पवार, देविदास पवार,देविदास पिंगळे, पंढरीनाथ थोरे, कल्याणराव पाटील, शिरीषकुमार कोतवाल, गणेश निंबाळकर, बेबीलाल संचेती, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विजय साने, बाळासाहेब पाटील यांच्यासह वसाकाचे माजी संचालक व विविध सामाजिक संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.





