Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या पोस्ट पार्सल हबचे श्रेणीवर्धन

नाशिकच्या पोस्ट पार्सल हबचे श्रेणीवर्धन

उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट पार्सल सेवा होणार अधिक वेगवान

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट पार्सल सुविधांना गती देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला केंद्र सरकारकडून मोठे यश मिळाले आहे. नाशिकमधील एल २ पार्सल हबचे एल १ पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमधील मोठ्या व जड पार्सलची वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मंत्री भुजबळ यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी नाशिकच्या इंट्रा सर्कल हब (आयसीएच) चे नॅशनल सॉर्टींग हब (एनएसएच) मध्ये श्रेणीवर्धन करून घेतले. यामुळे स्पीड पोस्टचा वेळ ३ दिवसांवरून २ दिवसांवर आला. त्याच धर्तीवर मेल आणि पार्सल ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट अंतर्गत नाशिक पार्सल हबच्या श्रेणीवर्धनासाठी त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार श्रेणीवर्धनल केंद्राची मंजुरी मिळाली. नाशिकचा अनोखा मान देशात १०९ पार्सल हब पैकी ७९ च्या श्रेणी बदल प्रस्तावित होते. यात एल २ ते एल १ श्रेणीवर्धन फक्त नाशिकला मिळाले आहे. देशातील ४५ एल १ पार्सल हब पैकी नाशिकचा समावेश झाला आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर (क्षेत्रीय कार्यालय) नंतर विभागीय कार्यालय असलेले नाशिक हे एकमेव एल १ हब झाले आहे.पायाभूत सुविधा आणि फायदे नाशिक रोड येथील एल १ हबसाठी अद्ययावत स्वयंचलित यंत्रणा उभारली जाईल. यापूर्वी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचे पार्सल मुंबईला जात असत.आता थेट नाशिकमधूनच पाठवले जातील व येतील. यामुळे वेळ व खर्चात बचत होणार आहे.

सिंगस्थ कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचा फायदा व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी,उद्योजक, विद्यार्थी, सर्वसामान्य जनता, ग्रामीण ई-कॉमर्स, नाशिकच्या समृद्धी महामार्ग, रेल्वे व विमानसेवा यांचा स्पर्धात्मक फायदा या प्रकल्पाला मिळणार आहे. यासाठी पोस्ट खात्याची मोठी स्थावर मालमत्ताही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.

पोस्ट सेवा आधुनिक आणि वेगवान झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था बळकट होईल. नाशिकच्या विकासाचा हा टप्पा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...