Friday, September 4, 2026
HomeनगरParner : वडनेर बुद्रुक येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड

Parner : वडनेर बुद्रुक येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क, क-विभाग, अहिल्यानगर व पारनेर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कुकडी नदीकाठ, वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती केंद्रावर सोमवारी (दि. 20) कारवाई करून 4 हजार लिटर रसायन व इतर साहित्य असा 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर (रा.उ.शु. पुणे विभाग), अधीक्षक नितीन घुले (रा.उ.शु. अहिल्यानगर-1), पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत निरीक्षक सी. एस. रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, दुय्यम निरीक्षक उमेश ढोले, महेंद्र साळवे, पोलीस उपनिरीक्षक कडूस तसेच राज्य उत्पादन शुल्क जवान पवार, बुरा आणि पोलीस कर्मचारी धामणे, लगड, जवरे, वाघ, बोबडे यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

default-featured-image

MP Shobha Bachhav : काँग्रेस खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल...

0
नाशिक | Nashik धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (MP Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक (Mobile Hacked) झाल्याची...