Wednesday, October 21, 2026
Homeनगरभीषण अपघात! भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भीषण अपघात! भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वैजापूर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील वैजापूर जवळील जरूळ फाट्यावर शुक्रवारी सकाळी भीषण रस्ता अपघात घडला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात मुंबईच्या एका २९ वर्षीय तरुणाचा करुण अंत झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज संजय घुले (वय २९, रा. मुंबई) आणि प्रशांत हनुमंत भोरे (वय २७, रा. आवसारी मंचर, जि. पुणे) हे दोघे आपल्या कारने (क्रमांक MH 03 BE 5529) छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक महामार्गाने वैजापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांची कार जरूळ फाट्याजवळ आली असता, तेथील धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक वाहेद पठाण यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. त्यांनी जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून राज घुले यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत भोरे यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैजापूर पोलीस ठाण्याला दिली. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा आणि धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बिनविरोधसाठी नेत्यांची पुन्हा एकी, कार्यकर्त्यांचे काय?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी आज बुधवार (दि.21) रोजी शेवटची मुदत आहे. तत्पूर्वी मंगळवारी दसर्‍याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येत...