Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNilesh Chavhan: वैष्णवीने आत्महत्यापूर्वी निलेश चव्हाणशी संवाद साधला? आजच्या कोर्ट सुनावणीत नेमके...

Nilesh Chavhan: वैष्णवीने आत्महत्यापूर्वी निलेश चव्हाणशी संवाद साधला? आजच्या कोर्ट सुनावणीत नेमके काय घडले?

पुणे | Pune
वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता. नंतर काल नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. त्याने वैष्णवीच्या बाळाला संभाळायची जबाबदारी कशी दिली? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत ३ जूनपर्यंत निलेश चव्हाणला पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश विक्रांत खंदारे यांनी हा निर्णय सुनावला आहे.

कोर्टात नेमके काय घडले?
आरोपी निलेश चव्हाण याला काल नेपाळ बोर्डरवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सुट्टीकालीन न्यायालयात त्याला हजर करण्यात आले आहे. या वेळी कोर्टात सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे. तसेच, वैष्णवीच्या बाळाला काय कारणाने जवळ ठेवले. याचीही चौकशी करायची आहे, असे न्यायालयात स्पष्ट केले होते. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर निलेश चव्हाण याच्या वकिलांनी आशिलाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे पोलिस कोठडी मिळू नये. फक्त मोबाइल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. पिस्तुल परवाना त्यांच्याकडे आहे त्याचा कुठेही गैरवापर झालेला नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

- Advertisement -

दोन्ही पक्षांच्यात काय युक्तीवाद झाला?
सरकारी वकीलः आरोपी हा या दोन्ही कुटुंबाचा नातेवाईक नसतानाही त्याच्याकडे बाळ कसे ठेवले? याची चौकशी करायची आहे. काल आरोपीला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. मयत आणि हगवणे कुटुंबाशी त्याचे या काळात नेमके काय बोलणे झाले त्याचा गुन्ह्यात काही सहभाग आहे का याची चौकशी करायची आहे. आरोपीला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.

निलेशचे वकीलः गुन्हा घडण्याआधी माझ्या अशिलाचा यात काहीच सहभाग नव्हता. फक्त बाळापुरता संबंध आलेला तोही सांभाळायला दिले म्हणून, बाकी काही संबध नाही.

निलेशचे वकीलः या प्रकरणात निलेशचा काय सहभाग आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही.
आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे असणारे पिस्तूलचा कुठेही वापर झाला नाही.

सरकारी वकीलः निलेश चव्हाण हा हगवणे किंवा कस्पटे कुटुंबीयांचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे बाळ कसे काय याचा तपास करायचा आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्यापूर्वी निलेश चव्हाण यांचा संवाद झाला आहे, याचा तपास करायचा आहे.

सरकारी वकील: मोबाईल डाटा डिलीट केला असेल ते त्याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडे असणाऱ्या शस्त्राचा तपास करायचा आहे. त्याचा उद्देश काय होता याचा तपास करायचा आहे.

निलेशचे वकीलः निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. अटक करायची आणि पुरावे रचले जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...