Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअस्ताव्यस्त वाहने पार्क करणाऱ्यांनो सावधान! वाहने टोइंग करण्यास झाली सुरुवात

अस्ताव्यस्त वाहने पार्क करणाऱ्यांनो सावधान! वाहने टोइंग करण्यास झाली सुरुवात

नाशिक | दि. ३ प्रतिनिधी

मागील टोईंगचा अनुभव व गोंधळ ताजा असतानाच शहरातील रस्त्यांवरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रहदारीस आडथळा होत असल्याने शहर वाहतुक विभागाने पुन्हा एकदा वाहने टोईंग करण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

करोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच पुन्हा शहरात रस्त्यांवर गर्दीच गर्दी सुरू झाली आहे. पुर्वीप्रमाणेच रस्त्यांच्या कडेला कशाही प्रकारे दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत.

परिणामी रस्त्यावरील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात आडथळा होऊन वाहतुक कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील प्रमुख मार्गांवर आहे.

मागील वर्षी शहरात टोईंग सुरू होते. पंरतु कंत्राटदाराच्या गाडी उचलणार्‍या युवकांवरून मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती. तसेच टाईंगचा ठेका देताना दिलेल्या अटी व नियमांचे तसेच यांत्रिक पद्धतीने वाहने उचलण्याच्या अटींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या कारणातून टाईंग ठेक्यास मुदत वाढ न देता तो बंद करण्यात आला होता. टोईंग बंद होताच शहरात वाहनांचे कोठेही कसेही पार्किंग सुरू झाले होते.

पंरतु, केवळ वाहतुक पोलीसच दंडात्मक कारवाई करत होते. यातच लॉकडाऊन सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनेच नसल्याने पोलीसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता.

मागील महिनाभरापासून शहरात वाहनांची पुर्वीपेक्षा अधिक गर्दी सुरू झाली असून वाहतुक कोंडीने नागरीक हैराण झाले आहेत. यामुळे पुन्हा टोईंगचा ठेका देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

याबाबतचे निवेदनाची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार टोईंगची निविदा प्रक्रीया सुरू झाली असून ३ महिन्यांसाठी हा ठेका देण्यात येणार आहे.

या निविदा भरण्याची अंतिम तारीख १४ जुलैपर्यंत आहे. प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया व ठेका देण्याची प्रक्रिया महिनाभर चालणारी आहे. यानंतर ठेका कोणती कंपनी घेते आणि कशी कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या