Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयMaharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी 'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात...

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी ‘वंचित’ची दुसरी यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?

मुंबई । Mumbai

विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतलेली दिसते. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षाने मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या आणखी दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली.

- Advertisement -

मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी

मलकापूर – शहजाद खान सलीम खान
बाळापूर – खातिब सय्यद नतीकउद्दीन
परभणी – सय्यद सलीम सय्यद साहेबजान
संभाजीनगर मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद
कल्याण पश्चिम – अयाझ गुलजार मोहवी
हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला
माढ – इमतियाज जफर नडाफ
शिरुळ – अरीफ मोहम्मअली पटेल
सांगली – अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी

सध्या या जागा कोणाकडे?

मलकापूर- राजेश एकाडे – काँग्रेस
बाळापूर- नितीन टाले- सेना
परभणी- राहुल पाटील- सेना
संभाजीनगर मध्य- प्रदीप जैस्वाल- सेना
गंगापूर- प्रशांत बंब- भाजप
कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर- सेना
हडपसर- चेतन तुपे- राष्ट्रवादी
माण- जयकुमार गोरे- भाजप
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर-अपक्ष
सांगली -सुधीर गाडगीळ- भाजप

पहिल्या यादीतील उमेदवार

रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण – फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व – विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने

दरम्यान वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवेळी झाला होता. मात्र, सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती. लोकसभेत चांगली कामगिरी वंचितला करता आली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...