Sunday, June 14, 2026
Homeनगरईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणार्‍या वाहनाला अपघात; पोलीस व चालक जखमी

ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणार्‍या वाहनाला अपघात; पोलीस व चालक जखमी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर शिवारात मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणार्‍या वाहनाला अपघात झाला असून यातील पोलिसांसह चालक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निवडणूक आयोगाच्या नेवासा तहसील कार्यालय मार्फत सुरू असलेल्या मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणार्‍या वाहनाचा (एमएच 4 डीसी 8163) चालू गाडीमध्ये अचानक एक्सीलीटर फसल्याने गाडीची गती वाढली व गती वाढल्याने वाहन चालकाचा ताबा गाडीवरून सुटण्याच्या अगोदरच चालकाने ब्रेक दाबला असता गाडीला गती असल्यामुळे गाडीचा तोल जाऊन रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन गाडी दोनशे फुटापर्यंत फरपटत जाऊन अपघात झाला.

या गाडीमध्ये बसलेले पोलीस कॉ.राहुल खंडागळे तसेच गाडीचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात व जखमींची माहिती घेतली.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...