Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान, निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान, निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर आता केंद्रीय निवडणुक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होईल असे सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल.

- Advertisement -

९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. तसेच मतदान आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतील दोन्ही सभागृहातील सदस्य हे मतदार असतात. सद्यस्थितीत दोन्ही सभागृहांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी एनडीएसाठी फारशी अवघड जाण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत आता सत्ताधारी भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IPL 2026 : वानखेडेवर आज मुंबई-चेन्नई भिडणार; विजयी षटकार कोण मारणार?

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) आता निर्णायक टप्प्यावर आली असून, आज (गुरुवारी) क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी फाईट पाहायला मिळणार आहे. आयपीएल इतिहासातील...