
पुणे | Pune
पुण्यातील गणेशोत्सवात डीजे मुक्त गणेशोत्सवाचा मुद्दा चर्चेत आलेला असतानाच आणि कर्णकर्कश आवाजाला विरोध करणारे नागरिक विद्यानंद बापट सध्या त्यांच्या एका संस्कृत सुभाषितामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्’ हे सुभाषित त्यांनी एका मुलाखतीदरम्यान अस्खलितपणे उच्चारले. त्यानंतर त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांची तुलना थेट इंग्रजीतील प्रभावी वक्ते शशी थरूर यांच्याशी करत ‘मराठीतले शशी थरूर’ अशी उपमा दिली आहे.
पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश आवाजाच्या वापरावरून सध्या वाद सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे वाजवल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांवर होणारा परिणाम विद्याधर बापट यांनी बैठकीत मांडला. मुख्य रस्ते बंद करून मोठ्या मिरवणुका काढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो, त्यामुळे उत्सवाच्या पद्धतीत कालसुसंगत बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यानंद बापट यांनी सांगितले. तसेच विद्यानंद बापट यांच्या अस्खलित मराठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
संपादकीय : ३ सप्टेंबर २०२६ – ‘आवाज’ विवेक, संस्कृती, आरोग्याचा!
पण हा वाद-विवाद सुरू असतानाच विद्यानंद बापट यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाची देखील खूप चर्चा होताना दिसतेय. विशेषतः त्यांनी म्हंटलेलं “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।” या वाक्याने तर भल्याभल्यांना घाम फुटलाय. अन् त्यावर आता लोकं मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्…असं विद्यानंद बापट म्हणाले. या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे, असा आहे.
पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे (DJ) आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना, आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले आहेत.




