Friday, April 25, 2025
Homeक्रीडाVinesh Phogat : मायदेशी परतताच विनेश फोगाट भावूक, घरच्यांना पाहून अश्रू अनावर

Vinesh Phogat : मायदेशी परतताच विनेश फोगाट भावूक, घरच्यांना पाहून अश्रू अनावर

दिल्ली । Delhi

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात नियमापेक्षा जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने (Vinesh Phogat ) तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती.

- Advertisement -

मात्र सुवर्ण पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न अपुरं राहिलं. यानंतर निराश झालेल्या विनेशने दुसऱ्याच दिवशी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रीडा लवादापुढे ही मागणी करण्यात आली की विनेशला रौप्य पदक देण्यात यावं. मात्र ही आशा मावळली.

दरम्यान विनेश फोगट दिल्लीला परतली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे जंगी स्वागत करण्यात आले. खूप दिवसांनी शेकडो लोकांची गर्दी आणि तिचे कुटुंबीय पाहून ती भावूक झाली आणि रडू लागली आणि तिला अश्रू थांबवता आले नाही.

तिची व्यथा पाहून सर्वजण भावूक झाले. ती सतत अश्रू पुसत होती. त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. तिच्या स्वागतासाठी त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त भारताचे स्टार कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक दिल्ली एअरला पोहोचले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...