Thursday, May 2, 2024
Homeनाशिकद्राक्षबाग नुकसान पंचनामे सुरु

द्राक्षबाग नुकसान पंचनामे सुरु

जानोरी । वार्ताहर Janori

अवकाळी पावसामुळे (Untimely rain) शेतकर्‍यांचे (farmers) अत्यंत नुकसान झाले आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई (Compensation) मिळावी यासाठी कृषी विभागाकडून (Department of Agriculture) नुकसान पंचनामे (panchanama) सुरू झाले आहे. दिंडोरी (dindori) तालुक्यात अनेक द्राक्षबागांचे नुकसान झाले असून कृषी विभागाने पंचनामे देखील सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवरच कुर्णोली (kurnoli) येथे कृषी सहाय्यक व ग्रामसेविका यांच्या पुढाकाराने द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) चिंचखेड (chinchkhed), खडकसुकेणा, कुर्णोली या गावांमध्ये कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक व ग्रामसेविका यांच्याकडून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे (crop panchamana) सुरू करण्यात आलेले आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कृषी सहाय्यक रूपाली लोखंडे (Agricultural Assistant Rupali Lokhande) व ग्रामसेविका राजश्री सनेर (Gramsevika Rajshri Saner), उपसरपंच शिवाजी नाठे, दत्तात्रय संधान, शांताराम संधान, नितीन नाठे आदींनी उपस्थित राहून पंचनामे केले.

ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल त्यांनी कुर्णोली ग्रामपंचायतीत संपर्क साधावा असे आवाहन ग्रामसेविका राजश्री सनेर यांनी केले आहे.यावेळी गोविंद नाठे, खंडेराव झोमन, दीपक नाठे, भाऊसाहेब झोमन, सोपान संधान, शंकर संधान, वाल्मीक नाठे, रावसाहेब नाठे, जालिंदर नाठे, उत्तम बोरस्ते आदी शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या