Wednesday, June 17, 2026
Homeक्राईमPathardi : आंबीजळगाव येथे ईडीचा छापा

Pathardi : आंबीजळगाव येथे ईडीचा छापा

व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी फसवणूक प्रकरण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधींना गंडा घालणार्‍या व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीप्रकरणी कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.20) आरोपी किरण पितांबर अनारसे याचा भाऊ अशोक पितांबर अनारसे याच्या घरी छापा टाकला. सुमारे दहा ते बारा तास त्याची कसून चौकशी केली. यामध्ये प्रमुख आरोपी विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे यांच्याशी दुबईशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावातील विनोद खुटे यांनी मेसर्स व्हीआयपीएस या नावाने एक ग्रुप स्थापन करून, त्याअंतर्गत अनेक कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम कर्जत, जामखेड, अहिल्यानगरमधील काही तालुके तसेच राज्यभर आणि राज्याबाहेरून गोळा केली. ही रक्कम बनावट कंपन्या व खात्यांच्या माध्यमातून व्यवहारात आणली गेली. त्यानंतर हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईला पाठविण्यात आले. एवढेच नव्हे, तर हे पैसे तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून यूएसबीटी कूट चलनाचाही त्यांनी वापर केला. सक्तवसुली संचालनालयाने आतापर्यंत या कंपनीच्या विविध ठिकाणी छापे मारून 75 कोटी 42 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

विनोद खुटे यांच्या खर्चाचा तपशील तपासला असता, त्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. यामधून त्यांनी दुबई आणि भारतात मालमत्ता देखील खरेदी केली आहे. याप्रकरणी पुण्यासह ठिकठिकाणी विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनावरांच्या गोठ्यात दुबईशी संबंधित वस्तू
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे अशोक अनारसे यांच्या घरी शुक्रवारी ईडीने छापा टाकला व सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत चौकशी केली. या तपास पथकाला जनावरांच्या गोठ्यात दुबईशी संबंधित काही वस्तू आढळून आल्या. यानंतर त्यांनी पुन्हा काही तास चौकशी करून अशोक अनारसे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. अशोक अनारसे यांचा या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामध्ये संबंध आहे का, याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे. कर्जत तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे कोट्यवधी रुपये यामध्ये अडकले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Water Shortage : पाऊसावरच नाशिककरांची भिस्त; धरणसाठा घटल्याने पाणीटंचाईचे सावट

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये १७ जून २०२६ रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात लक्षणीय घट...