Friday, September 4, 2026
HomeनगरAhilyanagar : मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुट्टी

Ahilyanagar : मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुट्टी

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना 1 (सोमवार) व 2 (मंगळवार) डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मतदान अधिकारी व कर्मचारी 1 डिसेंबर रोजी सकाळपासूनच नियुक्त शाळांमध्ये दाखल होणार असल्याने त्या दिवशी शाळा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. मतदानाच्या दिवशी, म्हणजे 2 डिसेंबर रोजी, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची व कर्मचारी-अधिकार्‍यांची ये-जा होणार असल्याने नियमित शैक्षणिक कार्य सुरळीत पार पडू शकत नाही.

त्यामुळे दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा आणि सुरळीत पार पडावी, मतदारांना सोयीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित सर्व शाळांनी आणि शिक्षण विभागाने याबाबत आवश्यक ती तयारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मनाई आदेश जारी
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व 1 नगरपंचायत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 33 व 36 अंतर्गत 3 डिसेंबर 2025 पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी असून, त्या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मिरवणुका, रॅली, सभा किंवा जमाव यासंबंधी ठरविलेले मार्ग, वेळा व पध्दती काटेकोर पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्‍या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि....