Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्र"लंडनमधून भारतात येणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत"; 'या' इतिहास संशोधकाचा मोठा...

“लंडनमधून भारतात येणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत”; ‘या’ इतिहास संशोधकाचा मोठा दावा

मुबंई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) हे लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून आणली जाणारी वाघनखे (Wagh Nakh) ही शिवरायांची नाहीत असा दावा करत होते. तसेच या संदर्भात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याशी माझा पत्र व्यवहार झाला आहे. या पत्रात देखील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा म्युझियम कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवभक्तांची फसवणूक करू नये, असे परखड मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या मतामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून हायअलर्ट

यावेळी बोलतांना सावंत म्हणाले की, “सध्या महाराष्ट्र सरकार जी वाघनखे भारतात आणत आहेत, ती १९७१ साली व्हिक्टोरिआ अल्बर्ट म्युझियमला गेली आहे. तशी सध्या सहा वाघनखे त्यांच्याकडे आहेत. ब्रिटिश म्युझियम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम (Museum) ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय आहेत. ज्या संग्रहालायातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणत आहेत. ते संग्रहालय सांगत आहे की, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितले आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात (India) घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे”, असे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिले असल्याचे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Video: किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायर

सावंत पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) वापरलेली वाघनखे ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत.आणि पुरावे ठोसपणे सांगतात की, ती वाघनखे साताराच्या छत्रपतींच्याकडे कायम राहिली आहेत. महाराष्ट्राची (Maharashtra) अस्मिता या वाघनखांशी जोडली गेली आहे, म्हणून लंडन मधील असणाऱ्या वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत, असे सांगून छत्रपतींच्या आणि विशेषतः पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुर्नस्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासहार्यतेला तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका उपस्थित होत असून खरी वाघनखे ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही. यामुळे याबाबतची अधिकची माहिती स्वतः उदयन महाराज देऊ शकतील. त्यामुळे त्यांनी या संदर्भात जनतेसमोर येऊन बोलायला हवे, असेही इंद्रजीत सावंत यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

तसेच व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने ही वाघनखे महाराजांची नाहीत असे सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री (Minister) धादंत खोटे बोलत आहेत. ही वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी सरकारकडून करोडो रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक (Fraud) असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, असेही इंद्रजीत सावंत म्हणाले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या