Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSantosh Deshmukh Case : "एसआयटीचे प्रमुख तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी..."; वाल्मिक...

Santosh Deshmukh Case : “एसआयटीचे प्रमुख तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी…”; वाल्मिक कराडच्या पत्नीचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये राज्य सरकारने आता नवीन एसआयटीची स्थापना केली असून आज पुन्हा एकदा कराडला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

- Advertisement -

खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल कराडला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर दुसरीकडे मकोका अंतर्गत कारवाईसाठी एसआयटी आज ताबा मागणार आहे. त्याकरिता पुन्हा एकदा न्यायालयासमोर युक्तिवाद होणार आहे. अशातच वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या बदलीची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी बोलतांना मंजिली कराड म्हणाल्या की, ‘जेव्हा ही घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. या खूनाशी माझ्या पतीचा काही संबंध नाही. ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले हे मराठा समाजाच्या लोकांना डोळ्यात खुपू लागले. सुरेश धस यांचं वक्तव्य होतं की मी तुमची माती करेल. निवडणूक झाल्यावर बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा अंजली दमानियाने मिस्टर सोबत फोटो सादर केले यावरून टीका केली. आताचे एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. शितल उगले या IAS ऑफिसर असून त्या आष्टीच्या राहणाऱ्या आहेत. धसांनी जावई याठिकाणी एसआयटीमध्ये आणून बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका. निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देत आहात. मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे थांबवा. माझ्या पतीने सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली आहे. माझी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. एसआयटीचे लोक काहीही करून माझ्या पतीला अडकवू शकतात. बसवराज तेली यांची बदली करावी, उद्या त्यांना बदलले नाही तर रोडवर चक्का जाम करणार आहोत. तेली आणि सुरेश धस यांचे सीडीआर काढा, अशी मागणी देखील मंजिली कराड यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या