मुंबई | Mumbai
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथक या प्रकरणांमध्ये तपास कामी काम करत आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली असून यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या पत्नीचा देखील समावेश आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता वाल्मिक कराडबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल करण्यात आला आहे. मात्र, ते फरार असून आज पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या आदेशानंतर वाल्मिक कराड यांचे बॅंक खाते गोठविण्यात आले आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराड हे शरण येणार असल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना (Police) शरण येण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेण्यात आले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून (Pune District) ताब्यात घेतले होते. तर विष्णू चाटेला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत.