Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Rain News : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोर 'धार'; घरे आणि दुकानांमध्ये शिरलं...

Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोर ‘धार’; घरे आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी

त्र्यंबकेश्वर मंदिरातही शिरलं पाणी,  

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहतांना पाहायला मिळत आहे. तर नाशिक शहरात (Nashik City) देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अशातच आज सकाळपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने अक्षरक्षा थैमान घातले असून त्र्यंबक शहरातील दुकाने आणि घरांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

यात त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) गोदावरी नदीच्या पाठीमागच्या बाजूने पूर आल्याने मंदिरात पाणी शिरले असून मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेले गायत्री मंदिरात देखील पाणी शिरले. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर शहरातील लक्ष्मी नारायण चौक, भगवती चौक, बोहरपट्टी, गोकुळदास लेन, गोकुळदास कॉर्नर या भागातील २५ ते ३० घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे मोठे नुकसान झालेले नाही. पंरतु, घरांत आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

हे देखील वाचा : Nashik News : तळीरामांची झिंग उतरणार; आषाढी अमावस्येनिमित्त पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त

तर त्र्यंबक शहरात (Trimbakeshwar City) आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील अहिल्या आणि गोदावरी संगमावर गेल्यानंतर पाणी पाहून गोदावरी अहिल्या नदीवर कोपली की काय अशी स्थिती होती. तसेच आज सुट्टीचा दिवस असल्याने नगरपालिका प्रशासनाचे कुठलेही प्रतिनिधी या भागाकडे फिरकले सुद्धा नाही. गेल्या चार दिवसांपासून येथे सतत पाऊस पडत आहे. मात्र, आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल दीड तास रस्त्यांवर पाणी थांबून असल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला वाहून; आईने फोडला टाहो

या कारणामुळे आला पूर

त्र्यंबकेश्वर शहरात रस्त्यावर पूरस्थिती असतांना गायत्री मंदिराजवळून मंदिराच्या पटांगणात पाणी शिरले. पण त्याचवेळी गायत्री मंदिरामागे नदीपात्रात पाणी पातळी अर्ध्यावर होती. याचा स्पष्ट अर्थ असा की पावसाचे पाणी नदीपात्रात व्यवस्थित जात नाही. उंच रस्ते व नदीवरील स्लॅब व रस्ता हे जवळपास समांतर असल्यामुळे मेनरोड आणि बाजारपेठ भागात पाणी साचते. थोडक्यात शहरात भुयारी गटारी बांधून किती उपयोग झाला हे पण तपासणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पंचक्रोशीत इमारती बांधल्या जातात पण पाणी निचरा होईल असे नियोजन केले जात नाही असा आरोप होत आहे. तसेच इतर ठिकाणी नदीने धोक्याची पातळी गाठली तर पूर येतो. मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये नदी बंदिस्त असतांना व नदीची पाणी पातळी अर्ध्यावरच असताना गावात मुख्य मेनरोड भागात पाणी साचते व मंदिराच्या पटांगणात पाणी शिरते ही गोष्ट विचार करण्यासाखी आहे.

हे देखील वाचा : देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या