घोटी | वार्ताहर Ghoti
इगतपुरी तालुक्यात गत 24 तासात सुमारे 90 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे नांदूरमधमेश्वर प्रकल्पा अंतर्गत असलेल्या दारणा धरणातून 11 हजार 456 क्यसेस विसर्ग करण्यात आला आहे.त्याचबरोबर अडीच टीएमसी पाणी साठा असणारे भाम धरण 100 टक्के भरल्याने ओसंडून वाहत होते. या धरणातून 5283 ने क्यूसेस विसर्ग सुरु आहे तर भावली धरणातून 1218 क्यूसेसने विसर्ग सुरु आहे गेल्या आठ दिवसापासून कोसळत. असलेल्या या पाऊसाने इगतपुरी तालुक्यात थैमान घातले आहे.
उत्तर महाराष्ट्रात इगतपुरी तालुक्यात पहिल्यांदाच भावली धरण 100 टक्के भरले जाते त्यामुळे तालुक्यात गेल्या आठदिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा, कडवा, वाकी हे धरणेही भरण्याच्या मार्गावर आहे तर मुबंईला पाणी पुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरण ही भरण्याच्या मार्गावर आहे विशेष म्हणजे गतवेळी भाम धरणात फक्त केल्या वर्षी अल्प साठा होता तर यावर्षी गेल्या वर्षी च्या तुलनेत 20 दिवस आगोदरच भाम धरण भरले आहे तसेच धरणातून विसर्ग देखील सुरू आहे.
इगतपुरी तालुक्यात गेल्या पाच वर्षातील या महिन्यात विक्रमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे यामध्ये आतापर्यंत 1588 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात उसंत न दिल्याने समाधानकारक होणार्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे तालुक्यात पडणार्या पावसाच्या सरासरीची 45 टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून,या वर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धरणसाठा टक्केवारी
मुकणे 71 टके
वाकी 84 टक्के
कडवा 61 टक्के
दारणा 61.88 टक्के
भावली 100 टक्के
भाम 100 टक्के
दारणा 61. 88 टक्के





