Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूज८ नोव्हेंबरला नाशिकच्या 'या' विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

८ नोव्हेंबरला नाशिकच्या ‘या’ विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती व चाचणी कामी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे.त्यामुळे शनिवारी (दि.८) होणार पाणीपुरवठा शहरातील काही भागांत होणार नाही.

- Advertisement -

महापालिकेचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे शनिवारी महावितरण कंपनीमार्फत सकाळी १० ते दु.४ वाजेदरम्यान ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती व चाचणी कामी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे. त्यानुसार सदर कालावधीत विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा बंद राहील, त्यामुळे सदर जलशुध्दीकरण केंद्र येथून नाशिक शहरातील नवीन नाशिक व नाशिक पुर्व भागास पाणी पुरवठा होणार नाही. (दि.९) सर्व ठिकाणी होणार पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नविन नाशिक विभागातील
प्रभाग क्र. २४ ,प्रभाग क्र. २५ ,प्रभाग क्र. २६ ,प्रभाग क्र. २७,प्रभाग क्र. २८,प्रभाग क्र. २९ ,प्रभाग क्र. ३०, पुर्ण पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक रोड,
प्रभाग क्र. २२ मधील वडनेर गेट, पंपीग पर्यंत, व रेंज रोड या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक पुर्व विभाग
नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. १४,प्रभाग क्र. २३ ,प्रभाग क्र. ३० पुर्ण

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....