Tuesday, June 17, 2025
Homeनगरभर पावसाळ्यात 9 हजार जनता टँकरच्या पाण्यावर

भर पावसाळ्यात 9 हजार जनता टँकरच्या पाण्यावर

संगमनेरची 7 गावे आणि 24 वाड्या तहानल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त 112 टक्के पावसाची नोंद झाली. परंतु, संगमनेर तालुक्यातील 7 गावांसह 24 वाड्यांमधील 9 हजार 617 लोकसंख्येची तहान 5 टँकरद्वारे भागवली जात आहे. महिनाभरात टँकर संख्येत घट झाली. परंतु, काही भागात टंचाईची स्थिती कायम असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात तिव्र टंचाईची स्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करून आवश्यक ठिकाणी टँकरला मंजुरी दिली.

- Advertisement -

दैनंदिन टँकरची गरज 31 मे रोजी 320 वर पोहोचली होती. जून नंतर सुरू झालेल्या पावसामुळे मात्र, टँकरची संख्या कमी होत गेली. 21 जुलैपर्यंत ही संख्या 62 पर्यंत घसरली. 1 जून 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 295 मिमी पाऊस अपेक्षीत होता, त्या तुलनेत पावसाचे वाढून 499 मिमीवर पोहोचले. त्याचबरोभर धरणेही भरल्यामुळे टंचाई स्थिती नियंत्रणात आली. पण आजही संगमनेर तालुक्यातील 9 गावात 5 टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे.सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी संगमनेर, नगर, पारनेर पाथर्डी या तालुक्यातील काही मोजक्या गावांना हमखास पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा देखील काही भागात टँकर सुरु आहेत. सध्या संगमनेर तालुक्यात 5 टँकरने 7 गावे आणि 24 वाड्यावस्त्यावर पाणी पुरवले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...