Thursday, November 12, 2026
Homeदेश विदेशते अत्यंत मेहनती, आमचे खूप चांगले जमते; सॅम पित्रोदांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच...

ते अत्यंत मेहनती, आमचे खूप चांगले जमते; सॅम पित्रोदांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतूक

नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कौतुकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोदी हे चांगले वक्ते, मेहनती, प्रेमळ आणि काळजी घेणारे व्यक्ती असल्याचे सांगत पित्रोदा यांनी त्यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पत्नीने आणि मी त्यांची भेट घेतली आहे. वैयक्तिक पातळीवर ते अत्यंत प्रेमळ, दयाळू आणि इतरांची काळजी घेणारे आहेत.”

“कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत” –
पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सॅम पित्रोदा म्हणाले, “मोदी एक अतिशय उत्तम वक्ते आहेत. ते अत्यंत मेहनती आहेत. आमचे खूप चांगले जमते. आमच्यात कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. एक गुजराती नेता, मित्र अथवा शुभचिंतक म्हणून मला मोदींबद्दल कोणतीही तक्रार नाही. त्यांनी माझ्याप्रती नेहमीच आपुलकी दाखवली आहे. मी गुजरातमध्ये त्यांच्या घरीही अनेक वेळा गेलो आहे, असेही पित्रोदा यांनी म्हटले आहे.

Watch: On Prime Minister Narendra Modi, Indian Overseas Congress chief Sam Pitroda says, “He is a Gujarati friend. I respect him as a person. My wife and I have met him. He has been very warm, kind, loving and caring at a personal level. Of course, he is a good orator and hard-working, and we get along well. We have no personal issues. I have nothing against Mr. Modi as a Gujarati leader, friend or well-wisher. He has been very warm towards me, and I appreciate that. Similarly, I have been to his house in Gujarat several times…”— IANS (@ians_india) November 12, 2026

- Advertisement -

‘मतभेद व्यक्तीशी नाहीत, तर विचारधारेशी’
पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करतानाच पित्रोदा यांनी राजकीय आणि वैचारिक मतभेदांबाबतही भूमिका स्पष्ट केली. मोदी यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी आणि विचारधारेशी आपली असहमती असू शकते; मात्र ही असहमती व्यक्तीविरोधात नसून त्यांच्या विचारांशी संबंधित आहे, असे त्यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी असहमत असतानाही त्या व्यक्तीशी चांगले वैयक्तिक संबंध ठेवता येतात. मोदी यांच्याशी मतभेद असले तरी त्यांच्यासोबत जेवण करणे आणि गप्पा मारणे शक्य आहे, असे पित्रोदा यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी –
सॅम पित्रोदा यांनी केलेल्या या कौतुकाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, “सॅम भाई आणि अंजना बेन, आपल्याला दिवाळी आणि नूतन वर्षानिमित्त खूप-खूप शुभेच्छा. येणारे वर्ष आपल्यासाठी आनंदमय आणि आरोग्यदायी जावो, हीच प्रार्थना. जय जगन्नाथ.”

ताज्या बातम्या

Nashik News : जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा राज्यस्तरावर गौरव; आणखी ६ प्राथमिक...

0
नाशिक | Nashik ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याने (Nashik District) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सार्वजनिक आरोग्य...