Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआम्हाला कर्जमुक्तीची तारीख मिळाली, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी- बच्चू कडू

आम्हाला कर्जमुक्तीची तारीख मिळाली, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी- बच्चू कडू

मुंबई |

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारकडून उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारने जीआर काढला आहे. सहा महिन्यांच्या आत समितीला कर्जमाफिसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. आम्ही तारीख घेण्यासाठी आलो होतो, आम्हाला तारीख मिळाली आहे, आम्ही सरकारने दिलेला शब्द आहे, या बद्दल आम्ही समाधानी आहोत. दरम्यान ३० जून २०२६ पर्यंत ७/१२ कोरा होणार असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले आहे. यावर आम्ही समाधानी आहोत. तूर्तास आंदोलनाची तूर्तास गरज नसल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...