Monday, June 22, 2026
HomeनगरShrigonda : शस्त्रांचा धाक, वॉचमनला बांधले अन् लाखोंचा माल लंपास

Shrigonda : शस्त्रांचा धाक, वॉचमनला बांधले अन् लाखोंचा माल लंपास

दरोडा प्रकरणातील सात आरोपी अटकेत || बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील कोळगाव शिवारातील चिखली घाट येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपवर शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून आरोपी मूळचे उत्तर प्रदेश व बिहार येथील रहिवासी आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कोळगाव शिवारातील चिखली घाट येथील युको सिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये हा दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी वर्कशॉपच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले वॉचमन तथा मजूर सुभाष आनंदा पवार (रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) यांचे हात टेपने बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्यांना गप्प बसण्यास भाग पाडले. यानंतर आरोपींनी वर्कशॉपचे पुढील शटर उघडून बाहेर थांबलेल्या साथीदारांना आत बोलावले. टोळीने वर्कशॉपमधील ट्रान्सफॉर्मरमधील मोठ्या प्रमाणातील तांबे (कॉपर) तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. नजीबउल्ला चम्मन सहा (वय 32, रा. बोटा तालुका संगमनेर, मूळ रा. बिजनोरा, उत्तर प्रदेश), अमितकुमार मुन्ना सरोज (वय 20, रा. वेळू ता. भोर, जि. पुणे, मूळ रा. मगरदहा, उत्तर प्रदेश), रवि ब्रिजलाल अग्रवाल (वय 34, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. भवरिया, उत्तर प्रदेश), सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल (वय 44, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. भवरिया, उत्तर प्रदेश), लालुकुमार कामेश्वर चौधरी (वय 22, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. झंजाडपूर, जि. मधुबनी, बिहार), शिवपुजन रामकुमार अग्रहरी (वय 27, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. महत्निया, उत्तर प्रदेश), कलामउद्दीन कमरउद्दीन ठाकुर (वय 41, रा. कुदळवाडी, विठ्ठल मंदिराजवळ, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, आदित्य बेलेकर, चालक भाऊसाहेब शिंदे, विकास सोनवणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील प्रताप देवकाते, राहुल गुंडू, नितीन शिंदे व होमगार्ड यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

सार्वमत शिलेदारांचा दिमाखदार सोहळ्यात सन्मान

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner सायंकाळची प्रसन्न वेळ.. सूरमय संगीत.. आकर्षक विद्युत रोषणाई अन् गर्दीने भरलेले सभागृह.. फेट्यामध्ये मिरवणारे उल्हासी व रुबाबदार पुरस्कारार्थी.. पुरस्कारप्राप्त कार्यकर्तृत्ववान मान्यवरांचे मित्रमंडळी,...