Friday, September 11, 2026
HomeनगरRahata : तोल गेल्याने तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

Rahata : तोल गेल्याने तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

एका तरुणाचा तोल विहिरीत (Well) बुडून त्याचा दुदैवी मृत्यू (Drowning Death) झाला. ही घटना तालुक्यातील अस्तगाव येथे गोदवरी कालव्यावरील (Godavari Canal) नवीन पुलाजवळील गोर्डे वस्ती येथे घडली. या दुदैवी घटनेत सोमनाथ निवृत्ती गोर्डे (वय 37) याचा मृत्यू (Death) झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सोमनाथ हा घरापासून काही अंतरावर असलेल्या घास पिकाला सायंकाळी 6 वाजता पाणी भरत होता.

- Advertisement -

गायींचे दूध काढण्यासाठी घरी का येत नाहीत, म्हणून कुटूंबियांनी हाका मारल्या; परंतु हाकेला प्रतिसाद मिळाला नाही. बिबट्याची त्या भागात दहशत असल्याने बिबट्याने काही वाईट केले नाही ना ? अशी शंका घरच्यांना येवू लागली. त्यांनी घराजवळील गिन्नी गवतात शोध घेतला, परंतु यश आले नाही. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर एक हाताचा काही भाग पाण्यावर दिसला. या घटनेची कल्पना सर्वांना आली. कुटूंबियांनी तसेच आजुबाजुच्या रहिवाशांनी प्रांताधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. रात्री काही काळाने शिर्डी (Shirdi) तसेच राहाता (Rahata) येथील अग्निशमन यंत्रणा दाखल झाली. तत्पूर्वी रहिवाशांनी गळ टाकून विहिरीत सोमनाथ असल्याची खात्री करून घेतली.

बाजूला ठेवून सोमनाथला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रात्रीच लोणी (Loni) येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजि नं. 38/2025 बीएनएस 194 प्रमाणे दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल झिने करत आहेत.

दरम्यान, अस्तगाव (Astgav) परिसरात आठ दिवसांत अपघाती मृत्यूची ही तीसरी घटना आहे. तरकसवाडी येथील कैलास तरकसे या तरुणाचा बाभळेश्वर श्रीरामपूर रोडवर अपघात झाला, ज्यात तो मयत झाला. दुसरी घटना चोळकेवाडी येथे शेततळ्यात बुडून रामदास चोळके आणि अक्षय नळे या दोघांचा मृत्यू (Death) झाला. आता तिसऱ्या घटनेत सोमनाथ गोर्डे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...