Thursday, May 2, 2024
Homeजळगावमुलीच्या भेटीसाठी निघाले, रस्त्यातच हृदयविकाराचा झटका अन् मृत्यू

मुलीच्या भेटीसाठी निघाले, रस्त्यातच हृदयविकाराचा झटका अन् मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील म्हसावद येथील मुलीच्या भेटीसाठी सकाळी दुचाकीने निघाले. मात्र रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला. एका मंदिरावर थांबले, व त्याचठिकाणी मृत्यू झाला. सुरेश वामन गावडे वय 56 रा. हरिविठ्ठल नगर जळगाव असे मयताचे नाव आहे. गावडे यांची मुलीची भेट पूर्ण राहिली.

- Advertisement -

हरिविठ्ठल नगर येथील सुरेश गावडे यांचे वाघनगर परिसरात चहा नाश्त्याचे हॉटेल आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरेश गावडे हे त्यांची विवाहित मोठी मुलगी वर्षा हिला भेटण्यासाठी त्यांच्या एम.एच. 19 ए.टी. 4299 या क्रमांकाच्या दुचाकीने म्हसावद येथे जात होते. यादरम्यान शिरसोली जवळ मारुतीच्या मंदिराजवळ त्यांच्या छातील कळा यायला लागल्या. छातील दुखत असल्याने त्यांनी दुचाकी थांबविली व ते मंदिरावर थांबले. याचठिकाणी काही वेळातच मृत्यू झाला.

मंदिराजवळ असलेल्या वेफर व्यावसायिकाने मयत हे सुरेश गावडे असल्याची ओळख पटवित, त्यांच्या शिरसोली येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत सुरेश गावडे यांच्या पश्चात दोन मुले महेंद्र व दिपक तसेच सूना, सोनल व मनिषा तसेच तीन नातंवडे असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या