Thursday, March 13, 2025
Homeभविष्यवेधचक्की चलनासनाचे फायदे काय ?

चक्की चलनासनाचे फायदे काय ?

चक्की चलनासन म्हणजे दळन दळणे ही पारंपारिक पद्धत आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चक्की चलनासन केल्याने हाथ मजबूत बनतात. पाचन संस्था सुधारते आणि लवचिकपणा वाढतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोट कमी होते हे आसन करतांना काही सावधानी बाळगायची असते ती जाणून घ्या

आसन कसे करायचे – योग चटाईवर बसून घ्या पायत थोडे अंतर ठेवा. हे आसन तुम्ही पायाला जोडून पण करू शकतात. तळहात एकमेकांना जोडून घ्या. आता कमीत कमी 10 वेळेस उजव्या बाजूने डाव्या बाजूला तळहाताचे अर्धा वर्तुळ बनवा आणि परत डाव्या बाजूने उजव्या बाजूला करा. या आसनाला करतांना तुमचे कोपरे वाकायला नको म्हणजे तुम्ही मागे जातांना हाताला वाकवू नका तर स्वत:च मागे वाकायचे आहे. या आसनात वरती जातांना श्वास घेतात आणि खाली जातांना श्वास सोडतात.

फायदे –

1.चक्की चलनासन करतांना मणक्याची लवचिकता वाढते, आणि मजबूतपणा वाढतो
2. चक्की चलनासन केल्याने पोटातील चर्बी कमी होण्यास मदत होते.
3. चक्की चलनासन अभ्यासाने हात, मान, खांदे दुखण्यापासून आराम मिळतो चक्की चलनासन ने अनिद्राची समस्या दूर होते.

सावधानता –
गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. स्लिप डिस्क, पाठीचे दुखणे, पाठीचा कणा, या समस्या असल्यास हे आसन करू नये. हाय आणि लो ब्लड प्रेशर आलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. हर्निया किंवा छोटी-मोठी शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हे आसन करू नये. जेवण झाल्यानंतर लगेच हे आसन करू नये.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...