Monday, July 15, 2024
Homeमुख्य बातम्याव्हॉट्सअ‍ॅपचे 'कम्युनिटी फिचर' म्हणजे नेमके काय? कसा कराल वापर? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘कम्युनिटी फिचर’ म्हणजे नेमके काय? कसा कराल वापर? जाणून घ्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने इनचॅट पोल्स ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि कम्युनिटी असे तीन नवे फिचर लाँच केले आहेत. या तिन्हीमधील कम्युनिटी फिचर सध्या प्रचंड गाजत आहे…

कम्युनिटी फिचरच्या माध्यमातून ५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एकत्र करता येते. या फीचरने एका छताखाली अनेक ग्रुप येतात आणि त्यांच्यात गट संभाषण आयोजित करता येऊ शकते.

हे फीचर युजरला महत्वाचे ग्रुप एकत्र करण्यात मदत करते. समान रूची असलेल्या लोकांना एकाच छताखाली आणणे हे या फीचरचे उद्दिष्ट आहे. आजपासून सर्व युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी फीचर वापरता येत आहे.

कम्युनिटी फीचर म्हणजे नेमके काय?

कम्युनिटीच्या माध्यमातून एकाच छत्राखाली अनेक ग्रुप्स एकत्र येयेतात. याद्वारे युजरला संपूर्ण कम्युनिटीला अपडेट पाठवणे किंवा ते मिळवण्यासाठी सोयीस्कर ठरते. कम्युनिटी फीचरमुळे ग्रुप डिस्कशनसाठी अनेक ग्रुप एकत्र जोडता येऊ शकतात. कम्युनिटीमध्ये समावेश झाल्यावर तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रवेश करता येऊ शकते. अ‍ॅडमिनला देखील कम्युनिटीमधील सर्वांना माहिती देता येते.

Video : बंदुकीचा धाक दाखवत जबरी दरोडा; 28 तोळे सोन्यासह 17 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास

कम्युनिटी कशी तयार कराल?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा

  • ‘न्यू चॅटवर’ क्लिक करा आणि ‘न्यू कम्युनिटी’ पर्याय निवडा.

  • आता ‘गेट स्टार्टेड’ पर्याय निवडा

  • कम्युनिटीचे नाव, डिस्क्रिप्शन आणि प्रोफाइल फोटो अपलोड करा. कम्युनिटीला नाव देण्यासाठी २४ वर्णांची मर्यादा आहे.

  • कॅमेरा आयकनवर टॅप करून तुम्ही डिस्क्रिप्शन आणि कम्युनिटी आयकन देखील जोडू शकता.

  • विद्यमान ग्रुप जोडण्यासाठी नेक्स्टवर टॅप करा किंवा नवीन ग्रुप तयार करा.

  • कम्युनिटीमध्ये ग्रुप अ‍ॅड करून झाल्यानंतर क्रिएटवर टॅप करा.

नाशिकच्या शिंदे गटात ‘कूछ तो गडबड है’?

दरम्यान, तुम्ही अनाउन्समेंट ग्रुपव्यतिरिक्त ५० ग्रुप अ‍ॅड करू शकता. कम्युनिटी अनाउन्समेंट ग्रुपमध्ये तुम्ही ५ हजार सदस्यांचा समावेश करू शकता. कम्युनिटीतील कोणत्याही सदस्याला ग्रुप्स जॉइन करता येतील. तुमच्या कम्युनिटीसाठी कम्युनिटी अनाउन्समेंट ग्रुप आपोआप तयार होईल. येथे कम्युनिटी अ‍ॅडमिन्सना अनाउन्समेंट ग्रुपमधील सर्व कम्युनिटी सदस्यांना मेसेज पाठवता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या