Friday, July 3, 2026
Homeनाशिकगूढ उकलले; कानठळ्या बसवणारा आवाज कशाचा?

गूढ उकलले; कानठळ्या बसवणारा आवाज कशाचा?

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिककर पुन्हा एकदा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने भयभीत झाले होते. ओझर येथील एचएएल कंपनीमध्ये सुखोई विमानाची ट्रायल सुरु असल्यामुळे हा आवाज आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  प्रशांत वाघमारे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

- Advertisement -

गेल्या महिन्यात वसुंधरा दिनाच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठा स्फोटासारखा आवाज ऐकला होता. यावेळी हा आवाज  ‘शाॅक वेव्ह बूम’चा असल्याचे भौगोलिक अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी सांगितले होते.

आवाजाचा हवेतील वेग हा 343 मीटर प्रति सेकंद इतका होता. जो ‘मॅक’ या एककात मोजतात. एक मॅक पेक्षा अधिक वेग किंवा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेग असणारे असे विमान किंवा इतर कुठलीही गोष्ट ही ‘सूपर साॅनिक’ वेगाने प्रवास करणारी आहे अशी कन्सेप्ट किंवा पारिभाषिक शब्दाने ओळखले जाते.

सुपर साॅनिक हा वेग असतो. सुखोई 30 सारखी विमाने ही अडीच मॅक म्हणजे 825 मीटर प्रति सेकंद वेगाने हवा चिरत प्रवास करतात. जेव्हा पाच मॅक वेगाने अंतरिक्षयान किंवा अन्य वस्तू प्रवास करते तेव्हा ती हायपर सुपर साॅनिक वेगाने जाते असे म्हटले जाते. अशी माहिती जोहरे यांनी दिली.

काय आहे शाॅक वेव्ह बूम?

‘शाॅक वेव्ह बूम’ आणि नेहमीचा आवाज यात फरक आहे असे प्रा. जोहरे यांनी सांगितले. हवेच्या दाबात अत्यंत कमी काळात बदल होतो आणि वेगाने हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत हवेचा दाब सारखा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा शाॅक वेव्ह उत्पन्न होतात. ‘शाॅक वेव्ह बूम’ ही सायंटिफिक फेनाॅमेनान म्हणजे एक सर्व सामान्य वैज्ञानिक घटना आहे.

हवेत अत्यंत कमी वेळात पोकळी निर्माण झाली व हि मोकळी भरून काढण्यासाठी हवा जोरात कमी दाबाच्या क्षेत्रात शिरली कि शाॅक वेव्ह बूम म्हणजे स्फोट झाल्यासारखे आवाज येतात. लष्करी विभागातर्फे किंवा विहीर फोडण्यासाठी सुरुंग लावून केले जाणारे विस्फोट, भुगर्भातील अचानक जमिन खचने किंवा पाण्याची पातळी व प्रवाह बदलणे, भुकंप, त्सुनामी, विज चमकून हवा जळाल्याने निर्वात पोकळी तयार होणे व त्यात वेगाने हवा शिरून हवेचे थर एकमेकांवर आदळल्याने तसेच अचानक हवेचे आकुंचन किंवा प्रसरण पावणे अशी ‘शाॅक वेव्ह बूम’ निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत.

परीणामी जमिन, घराच्या खिडक्या हादरतात. कधी कधी घरातील भांडी देखील पडतात किंवा काचेची तावदाने देखील फुटतात. मात्र यात घाबरण्याचे काहीच कारण नाही. लाॅकडाउन मुळे लोक घरात असल्याने शांततेत या आवाजाकडे लक्ष वेधले जाऊन जास्त लोकांना ती जाणवला असेही प्रा. जोहरे सांगतात.

सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे सगळीकडे शांतता आहे. यामुळे अधिक जोरात आवाज ऐकू आला. याबाबत एचएएलच्या कंट्रोल रूमकडून सुखोई विमानाच्या ट्रायल सुरु असल्यामुळे आवाज आल्याचे सांगण्यात आले आहे.  नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

प्रशांत वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाशिक

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...